नाशिक - राज्यात सत्ता असताना भाजपने विरोधकांचे फोन टॅप करून त्यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. फोन टॅप केलेल्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश असल्याचे समजले आहे. यावर फोन टॅप होत असल्याचे कळताच मी फोनवर बोलणे बंद केल्याची माहिती मंत्री छगन भूजबळ यांनी दिली.
'फोन टॅप होत असल्याचे कळताच मी फोनवर बोलणे बंद केले' - phone tapping BJP
पालकमंत्री छगन भूजबळ हे नाशिक दौऱ्यावर आहेत. फोन टॅपींगबद्दल विचारले असता, माझे फोन देखील टॅप होत असल्याची माहिती मला मिळाली. त्यामुळे, मी फोनवर बोलणे बंद केले. या प्रकरणी चौकशी झाल्यावर सत्य बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
छगन भूजबळ
पालकमंत्री छगन भूजबळ हे नाशिक दौऱ्यावर आहेत. फोन टॅपींगबद्दल विचारले असता, माझे फोन देखील टॅप होत असल्याची माहिती मला मिळाली. त्यामुळे, मी फोनवर बोलणे बंद केले. या प्रकरणी चौकशी झाल्यावर सत्य बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा-नाशकात चोरट्याने घरफोडी करून १ लाख ४१ हजाराचा ऐवज लंपास