महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; आरोपी पती ताब्यात - Suspicious of character husband killed wife nashik

नांदगांव तालुक्यातील मंगळाणे या ठिकाणी राहणाऱ्या विजय याचे चाळीसगाव तालुक्यातील आशा संजय पवार यांच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी विजय हा आशावर संशय घेऊ लागला. तुझे बाहेर कुठेतरी अनैतिक संबंध आहेत यावरून तो नियमित आशाला मारझोड करत असे. सोमवारी त्याने रागाच्या भरात ऊसतोडणीचा कोयता हातात घेऊन आशाच्या गळ्यावर दोन वार केले. यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने आशाचा जागीच मृत्यू झाला.

मृत आशा पवार

By

Published : Nov 5, 2019, 4:20 PM IST

नाशिक - ऊसतोड कामगाराने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची घटना नांदगाव तालुक्यात घडली. विजय वसंत आहिरे असे आरोपी पतीचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलीसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.

नांदगांव तालुक्यातील मंगळाणे या ठिकाणी राहणाऱ्या विजय याचे चाळीसगाव तालुक्यातील आशा संजय पवार यांच्याशी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी विजय हा आशावर संशय घेऊ लागला. तुझे बाहेर कुठेतरी अनैतिक संबंध आहेत यावरून तो नियमित आशाला मारझोड करत असे. सोमवारी त्याने रागाच्या भरात ऊसतोडणीचा कोयता हातात घेऊन आशाच्या गळ्यावर दोन वार केले. यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने आशाचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा -खड्ड्यांसाठी ८५ तक्रारदारांना ४२ हजार ५०० रुपये द्यावे लागणार

याबाबत आशाचे वडील संजय रंगनाथ पवार यांनी नांदगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. तर आरोपी विजय यास त्वरित अटक करण्यात आली. विजय यानेही आपणच आपल्या बायकोचा खून केल्याची कबुली दिली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव आणि उप पोलीस अधीक्षक समिर सिंह साळवे मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगावचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी तातडीने आरोपी पतीस अटक करून गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा -गावाने वाळीत टाकल्यामुळे 'तिचा' आत्महत्येचा प्रयत्न, त्वरित उपचारामुळे वाचला जीव

ABOUT THE AUTHOR

...view details