नाशिक -जिल्ह्यातील पाथर्डी गावात पतीने पत्नीच्या प्रियकरावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. यामध्ये प्रियकराच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. नरपतसिंग गावित, असे मृत व्यक्तीचे नाव असून अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
विठ्ठल गव्हाणे, असे संशयित आरोपीचे नाव आहे. तसेच मृत नरपतसिंग आणि गव्हाणे हे शेजारी राहत होते. गेल्या १५ दिवसांपूर्वी दोघांमध्ये भांडण झाले होते. यामुळे संबंधित घरमालकाने गव्हाणे यांच्याकडून घर खाली करून घेतले होते. मात्र, शुक्रवारी नरपतसिंग हा सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कंपनीत जाण्यासाठी निघाला. त्यावेळी विठ्ठल याने त्याच्यावर हल्ला केला. डोक्यावर आणि शरिरावर कोयत्याने वार केले.