महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या, आरोपी पतीनेही संपवले जीवन - sunita kadnir murder

मनमाडमध्ये पतीने पत्नीचा डोक्यात कुऱ्हाडीने वार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून दहेगाव येथे हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. पत्नीची हत्या करताच पतीनेही गाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केली.

murder
सांकेतिक छायाचित्र

By

Published : Jan 28, 2020, 2:56 PM IST

Updated : Jan 28, 2020, 4:44 PM IST

नाशिक - पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून स्वता इंदूर-पुणे महामार्गावर वाहना खाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मनमाडच्या दहेगाव येथे घडली. मृत पत्नीचे नाव सुनीता कडनोर तर पतीचे नितिन कडनोर आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची हत्या

मनमाड जवळील दहेगाव येथील तरुण शेतकरी नितीन कडनोर यांनी पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने डोक्यात आणि मानेवर घाव घालून तिची हत्या केली. यानंतर स्वत: पतीने देखील अज्ञात वाहनाखाली उडी घेत आत्महत्या केली. हा धक्कादायक प्रकार दुपारी दीड ते दोनच्या सुमारास घडला. या घटनेमुळे दहेगाव आणि आजूबाजूच्या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह पंचनाम करून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

दहेगाव येथील तरुण शेतकरी नितीन कडनोर याचे गेल्या अनेकवर्षापासुन आपल्या पत्नीसोबत वाद होते. अनेकदा त्यांचे कडाक्याचे भांडण देखील झाले आहे. नितिन यांचा आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. पत्नी सुनीता शेतात काम करत असताना नितिन याने कुऱ्हाडीने तिच्या मानेवर डोक्यात वर्मी घाव घालून तिचा खून केला. त्यानंतर त्यानेही इंदूर-पुणे राज्यमहामार्गावर येऊन अज्ञात वाहनांच्या खाली उडी घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Last Updated : Jan 28, 2020, 4:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details