नाशिक- शहरातील जेलरोड भागात रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. चंद्रभान जाधव (वय ४१, रा. लाखलगाव) असे मृत पतीचे नाव आहे.
चंद्रभान अशोक जाधव (वय ४१) हे आपल्या दुचाकीने (क्र. एम.एच १५ एफ.वाय ७२०३) पत्नीसोबत प्रेसरोड, कन्या शाळेकडून रस्ता ओलांडत जेलरोडकडे जात होते. त्यावेळी जेलरोडकडून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने (क्र. एमएच ०४ डी.एस ३५१४) जाधव यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेत ट्रकचे चाक जाधव आणि त्यांच्या पत्नीच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.