नाशिक- पुलावरून मोटरसायकल कोसळून झालेल्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना घडली. ही घटना दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा ते भनवड रस्त्यात दहीवी गावाजवळ घडली. मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे.
पुलावरून मोटरसायकल कोसळून पती-पत्नी जागीच ठार - nashik accidentlatestnews
पुलावरून मोटरसायकल कोसळून झालेल्या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना घडली. ही घटना दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा ते भनवड रस्त्यात दहीवी गावाजवळ घडली.
![पुलावरून मोटरसायकल कोसळून पती-पत्नी जागीच ठार Husband and wife killed on bike accident in Dindori](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7342101-59-7342101-1590406349214.jpg)
पुलावरून मोटरसायकल कोसळून पती-पत्नी जागीच ठार
मृत पती पत्नी हे वरंवंडी येथील होते. पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, करंजवन येथून मोटरसायकलने (क्र. एमएच १५ इटी १४४३) माळेगाव काजीकडे जात असताना हा अपघात घडला. ईश्वर संतोष शिंगाडे (वय, ३२), व सोनाली विश्वास शिंगाडे (वय,२८) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुढील तपास वणी पोलीस ठाण्याचे पोलीस हवलदार ए.एम. गायकवाड करीत आहेत.