नाशिक - वणी दिंडोरी मार्गावरील ओझरखेड वसाहतीजवळ दुचाकीला भरधाव वेगात असलेल्या पिकअपने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पती पत्नी ठार झाले आहेत. या प्रकरणी वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीला पिकअपची धडक; पती-पत्नी ठार - वणी दिंडोरी अपघात
मिळालेल्या माहीतीनुसार, पिकअप क्रं (एम. एच. 15 -EG6440)ने वणीकडून येणाऱ्या हिरोहोडा दुचाकीला (एम.एच 15 -HA 5898) धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सुधाकर रामराव महाले वय (वय 42) व त्यांची पत्नी संगीता सुधाकर महाले (वय 38) हे पती पत्नी ठार झाले. तर, या अपघातात दुचाकीचे नुकसान झाले असून पोलिसांनी पिकअप ताब्यात घेतली आहे.

याप्रकरणी वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंम्पी यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक उपनिरीक्षकआर. व्ही. सोनवणे व कुनाल मराठे करत आहे.