नाशिक- घराच्या अंगणात झोपलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला अलगद उचलून नेत बिबट्याने त्याची शिकार केल्याचा भयावह प्रकार निफाड तालुक्यातील भुसे गावात घडला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
गेल्या वर्षभरापासून नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणी बिबट्याचा असल्याचे सातत्याने समोर आले आहे. यामुळे नाशिकला बिबट्यांचे शहर म्हणूनही ओळखले जात आहे. शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास निफाड तालुक्यातील भुसे गावात राहणाऱ्या मोतीराम सोनवणे यांच्या घरा बाहेर कुत्र्याचे पिल्लू झोपलेले असताना त्याठिकाणी लोखंडी कुंपण ओलांडून बिबट्याने या कुत्र्याच्या पिल्लांची शिकार केल्याची घटना घडली आहे.दरम्यान शिकारीचा हा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बिबट्याकडून घराबाहेर झोपलेल्या कुत्र्याची शिकार हेही वाचा-जीएसटी परिषद : कोरोनाची 'ही' औषधे व उपकरणे होणार स्वस्त; लशीचे दर कायम
पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी
गेल्या वर्षभरात बिबट्याने नाशिक जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. अनेक ठिकाणी बिबट्याने माणसांवर आणि जनावरांवर हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात अनेकांनी आपला जीवदेखील गमावला आहे. मात्र पुन्हा एकदा बिबट्याने कुत्र्याच्या पिल्लाची शिकार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटेने संपूर्ण भुसे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी वनविभागाने अनेक बिबटे जेरबंद केले आहेत. मात्र, पुन्हा एकदा या ठिकाणी बिबट्या आढळून आल्याने वनविभागाने या ठिकाणी तातडीने पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे.
हेही वाचा-चीनच्या झुरॉंग रोव्हवरने मंगळावरून पाठविला पहिला सेल्फी