नाशिक : अल्पवयीन मुलीचे अपहरण (Success in rescuing a girl at Nashik) करून, तिची पावणेदाेन लाखांत परराज्यात विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टाेळीला ओझर पोलिसांनी (Ozar Police) अटक (Human trafficking gang busted by police) केली आहे. ग्रामीण पोलीस दलाचे अधिक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने 'ऑपरेशन मुस्कान' (Operation Muskan) अंतर्गत ही कारवाई केली. ग्रामीण पोलिसांनी मानवी तस्करी करणारी टोळी गाजाआड करत; एका आंतरराज्यीय टोळीचा (Interstate Gang) पर्दाफाश केला. कारवाईसाठी मध्यप्रदेशातील खरगाेन (Khargone in MP) येथे गेलेल्या पाेलिस पथकावर संशयित जमावाने व ग्रामस्थांनी हल्ला चढवत वाहनांवर दगडफेक केल्याची माहीती समाेर आली.
नाशिक जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांना ओझर पोलीस ठाण्यात दाखल एका गुन्ह्याचा तपास करत असताना, या प्रकरणाचा छडा लागला. या प्रकरणात पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेजही प्राप्त झाले होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांनी 'ऑपरेशन मुस्कान' राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हे प्रकरण 'गुन्हे शोध पथकाकडे' देण्यात आले. तपासाठी ४ ते ५ पथक तयार करून, ते गुजरात आणि मद्यप्रदेश या राज्यात रवाना करण्यात आले. आणि याच पथकाने या अपहरण झालेल्या मुलीची सुटका केली. १ लाख ७५ हजार रुपये घेऊन, या मुलीची विक्री करण्यात आल्याचे सत्य तपासात समोर आले. दरम्यान पीडितेची सुखरुप सुटका करण्यात यश आले.