नाशिक- बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात आज रविवार सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी वारा, विजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातले. त्यामुळे शेतकर्यांची एकच धांदल उडाली. तळवाडे दिगर पठावे दिगर येथे गारांचा अक्षरशः खच पडला होता.
नाशिक : तळवाडे दिगर येथे तुफान गारपीट, कांद्यासह भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान - तळवाडे दिगर नाशिक गारपीटीमुळे नुकसान
नाशिक जिल्ह्याच्या बागलाण, कळवण, सिन्नर या तालुक्यात बे-मोसमी पावसाने हजेरी लावली आहे. या वादळी पावसात कांद्या, द्राक्षे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून बाजूला रस्त्यावर पडले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
नाशिक जिल्ह्याच्या बागलाण, कळवण, सिन्नर या तालुक्यात बे-मोसमी पावसाने हजेरी लावली आहे. या वादळी पावसात कांद्या, द्राक्षे, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक ठिकाणी घरांवरील पत्रे उडून बाजूला रस्त्यावर पडले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या गारपीट, अतिवेगवान सोसाट्याचे वारे व विजांच्या कडकडाटामुळे बागलाण व कळवण तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले. उपटून खांडणीच्या तयारीत शेतात पडलेला हजारो क्विंटल उन्हाळी कांदा भिजला. तर हजारो हेक्टरवरील द्राक्ष व डाळिंब बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. गहू, हरभरा, पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. गारपीटीची सर्वाधिक झळ कांद्यासह भाजीपाला पिकांना बसली. या गारपीटीमुळे कांदा उत्पादक शेतकर्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले.
गारपीटीमुळे हाता तोंडाशी आलेला घासत हिरावून घेतला
वर्षभराचे कष्ट व लाखो रुपयांचा शेतमाल अर्ध्या तासात संपला आहे. कसमादे परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हातान्हात आपल्या लेकरा-बाळांसह कांद्यासाठी वर्षभर शेतात राब राब राबून निरसर्गाच्या आजपर्यंतच्या अस्मानी सुलतानी संकटांशी दोन हात करत आपले कांदा पीक पिकवले होते. मात्र, आज झालेल्या गारपीटीमुळे हाता तोंडाशी आलेला घासच हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत तर अनेकांच्या घरात आज चूलदेखील पेटली नाही.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी..
नाशिक जिल्ह्यात तीन दिवसांपासून काही तालुक्यात अवकाळी पाऊस होत असून या पावसामुळे कांदा, द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून बळीराजा उद्ध्वस्त झाला आहे. शासनाने तत्काळ शेत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.