नाशिक- त्र्यंबकेश्वर, सुरगाणा तालुक्यात परतीच्या पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परतीच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे. तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांची केली आहे.
त्र्यंबकेश्वर, सुरगाणा तालुक्यातील भात पिकाचे मोठे नुकसान - नाशिक भात पिकाचे मोठे नुकसान
परतीच्या पावसामुळे त्र्यंबकेश्वर, सुरगाणा तालुक्यात शेतातील कापलेले भात पीक पाण्यात बुडून खराब झाले आहे. अगोदरच कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांकडे पैसे नसतानाही सावकारी व सहकारी कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी शेती लागवड केली होती. अशातच अचानक आलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
परतीच्या पावसामुळे त्र्यंबकेश्वर, सुरगाणा तालुक्यात शेतातील कापलेले भात पीक पाण्यात बुडून खराब झाले आहे. अगोदरच कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांकडे पैसे नसतानाही सावकारी व सहकारी कर्ज घेऊन शेतकऱ्यांनी शेती लागवड केली होती. अशातच अचानक आलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परतीच्या पावसामुळे कापलेले पीक व ऊभे असलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी कापलेल्या व उभ्या पिकांचे पंचनामे करावेत. काही भागात फक्त कापलेल्या पिकांचेच पंचनामे केले जातात, तरी सरसकट पिकांचे पंचनामे करून बळीराजाला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
खरिपाची सुरुवात उशिरा झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर सुरगाणा तालुक्यातील भात उत्पादक मोठ्या जोमाने भाताच्या लागवडीला लागला. वेळ प्रसंगी दूरवरून पाणी वाहून भाताची लागवड करून रोप मोठे केले. मध्यंतर भाताच्या काडीमधील पोटरीतच आळी निघाली. त्यातच वादळी वाऱ्यासह पावसाचे संकट तोंडावर आले. धीर न सोडता पुन्हा जोमाने भात कापणीस तयार झाला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल परिसरातील अनेक गावातील शेतकरी भाताच्या शेतात वादळी वाऱ्यासह परतीचा पावसाच्या भीतीने भात कापणी करत होते. तर कापलेला भात जागेवर वाहून जागीच सडण्याचे काम चालू असताना मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाने मात्र, आपले रौद्र रूप धारण करून हरसूल आणि परिसरातील बळीराजाचे अक्षरशः कंबरडे मोडले.
हेही वाचा -शेतकऱ्यांना 100 टक्के मदत झाली पाहिजे-देवेंद्र फडणवीस
अनेक गावातील शेतकरी आपल्या शेतात भात गोळा करण्याच्या तयारीत असताना दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली 39 मिलिमीटर पावसाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल तोरंगण, ठाणापाडा, बोरीपाडा, देवडोंगरा, ओझरखेड, खरशेत, बेरवळ, होत मोखाडा, कोटंबी आदी गावांमधील भात पिकवणाऱ्या बळीराजाच्या डोळ्या समोर कापलेल्या भाताच्या पेंढ्या तरंगण्यास सुरुवात झाली तर नदी नाल्या शेजारील पीक वाहून गेले. तर सडकलेल्या भाताची साळ गोळा करण्यास ही वेळ मिळाला नाही.