नाशिक :भारतीय वायुदलात भरती होणाऱ्या वैमानिकांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले एचटीटी 40 जातीची संपूर्णतः भारतीय बनावटीची विशेष प्रशिक्षण विमाने तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे एचएएलमधील 3 हजार अधिकारी कर्मचाऱ्यांना काम मिळणार आहे. तर स्थानिक वेंडर्ससह इतर उद्योगांना व्यवसाय मिळणार आहे.
खासदार गोडसे एचएएल कंपनी प्रोजेक्टसाठी प्रयत्नशील : ओझर एचएएलमध्ये आतापर्यंत विविध प्रकारच्या विमानांची निर्मिती करण्यात आली आहे. येथील कारखान्यात सुमारे तीन हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. विविध प्रकारची यशस्वी विमाने तयार करण्यात एचएएल प्रशासनाचा मोठा हातखंडा आहे. परंतु, गेल्या काही वर्षापासून एचएएलकडे कामाचा ओघ काहीसा कमी झाला होता. यातूनच विमाने तयार करण्याचे वाढीव काम एचएएल कंपनीला मिळावे, यासाठी गेल्या काही वर्षांपासून खासदार गोडसे प्रयत्नशील होते. काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या पथकाने दिल्ली येथे संरक्षण विभागाचे सेक्रेटरी अजय कुमार यांची भेट घेतली होती. ओझर एचएएलला विमान निर्मितीची ऑर्डर देण्याचे साकडे घातले होते.
अनेक जातींच्या लढाऊ विमानांची निर्मिती :नाशिकच्या ओझरच्या एचएएलमध्ये आजपर्यंत अनेक जातींच्या लढाऊ विमानांची निर्मिती झाली आहे. या कारखान्यात 3 हजार अधिकारी, कर्मचारी आहेत. विविध जातींची लढाऊ विमाने तयार करण्यात येथील प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथे कामाचा ओघ काहीसा कमी आहे. त्यामुळे विमाने तयार करण्याचे वाढीव काम प्रकल्पाला मिळावे यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते.