नाशिक -येवला तालुक्यातील अंदरसूल येथे डॉ. राजेभोसले रुग्णालयात अज्ञात मारेकर्यांनी चाकू हल्ला करून कंपाउंडरला जखमी केले आहे. यानंतर हल्लेखोर फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
येवल्यात कंपाउंडरवर चाकू हल्ला... हल्लेखोर फरार! - compounder attacked in nashik
येवला तालुक्यातील अंदरसूल येथे डॉ. राजेभोसले रुग्णालयात अज्ञात मारेकर्यांनी चाकू हल्ला करून कंपाउंडरला जखमी केले आहे. यानंतर हल्लेखोर फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
येवल्यातील अंदरसूल येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या डॉक्टर राजेभोसले यांच्या हॉस्पिटलमध्ये सकाळी सात वाजेच्या सुमारास एका पेशंट म्हणून आलेल्या अज्ञाताने कंपाउंडरसोबत विचारपूर केली. डॉक्टर कधी येतील, असा प्रश्न त्यावे विचारला; आणि अचानक कंपाउंडर शिवाजी पैठणकर यांच्यावर चाकूने वार केला. यानंतर पैठणकर यांनी आरडाओरडा केल्याने हल्लेखोराने मुख्य गेट बंद करत पलायन केले. हे पाहताच स्थानिकांनी त्वरित धाव घेत जखमी कंपाउंडरला डॉक्टरांच्या हवाली केले.
सध्या पोलीस सीसटीव्ही फूटेजचा तपास घेत असून जखमी पैठणकर यांच्यावर उपचार सुरू आहेत.