नाशिक- शहरात शनिवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास गावगुंडांनी दगडफेक करत चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नाशिक रोड भागातील नारायण बापू नगर परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात अज्ञात गुंडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये गुंडाराज..! वाहनांच्या काचा फोडत गावगुंडांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न - vehicle
नाशिक शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून गावगुंडांनी धुमाकूळ घातल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी काही समाजकंटकांनी पाथर्डी फाटा येथील दोन वाहने जाळण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना होत नाही तोच नाशिक रोड भागातील नारायण बापू नगरमध्ये गावगुंडांच्या टोळक्याने एकत्र येत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.
नाशिक शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून गावगुंडांनी धुमाकूळ घातल्याचे समोर आले आहे. दोन दिवसांपूर्वी काही समाजकंटकांनी पाथर्डी फाटा येथील दोन वाहने जाळण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना होत नाही तोच नाशिक रोड भागातील नारायण बापू नगरमध्ये गावगुंडांच्या टोळक्याने एकत्र येत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. या गुंडांनी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास परिसरात उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांना लक्ष्य करत त्यांच्या काचा फोडल्या. तसेच बाजूला असलेल्या पोलीस चौकीवरही या गुंडांनी दगडफेक केली.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नाशिक शहरात पोलीस एकीकडे हेल्मेट सक्ती करत वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे मात्र गाव गुंडांकडून शहरात दहशत निर्माण करण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. त्यामुळे पोलिसांनी या गुंडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.