नाशिक- राज्यात १५६ ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले असून या प्रकरणी ५५० हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे. मालेगावमध्ये पोलिसांवर हल्ले होत आहेत. त्यांना प्रेमाच्या भाषेने समजून सांगा. तरीदेखील समजले नाही तर पोलिसी खाक्या दाखवा, असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले.
...तर पोलिसी खाक्या दाखवा - गृहमंत्री - हाॅटस्पाॅट
राज्यात विविध ठिकाणी नागरिका पोलिसांना जुमानत नाहीत. अशा नागरिकांना प्रथम प्रेमाने समजवा नाही ऐकले तर पोलिसी खाक्या दाखवा, असा आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिले आहेत.
परप्रांतिय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविण्याची व्यवस्था केली जात आहे. याबाबत संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यासह मालेगावातील परिस्तितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आज नाशिक दौऱ्यावर आले आहे. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्तीत होते.
हेही वाचा -नाशिक पोलिसांनी गाणे वाजवून वधू-वरास दिल्या लग्नाच्या शुभेच्छा