नाशिक- बरेलीहून मुंबईकडे निघालेल्या गाडी क्रमांक 02062 या हॉलिडे एक्स्प्रेसच्या एसी डब्याचे चाक तुटल्याने गाडी रुळावरून घसरली. ही घटना आज सकाळी नांदगांव रेल्वे स्थानकाजवळ घडली. दरम्यान गाडीचा वेग कमी असल्याने, मोठा अपघात टळला. मात्र, या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
नांदगाव स्थानकाजवळ हॉलिडे एक्स्प्रेसचे चाक तुटले; मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प - बरेली
हॉलिडे एक्स्प्रेस बरेलीहून मुंबईला येत होती. या एक्स्प्रेसचे नांदगाव स्थानकावर 2 डबे रुळावरून घसरल्याने अपघात झाला. रेल्वेच्या चाकाला तडे गेल्याने चाक तुटले. यामुळे डबे घसरल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हॉलिडे एक्स्प्रेस बरेलीहून मुंबईला येत होती. या एक्स्प्रेसचे नांदगाव स्थानकावर 2 डबे रुळावरून घसरल्याने अपघात झाला. रेल्वेच्या चाकाला तडे गेल्याने चाक तुटले होते. यामुळे डबे घसरल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. या घटनेत अद्याप कोणतीही हानी किंवा कोणी जखमी झालेली नाही. जेव्हा चाक तुटले तेव्हा गाडीचा वेग कमी होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळून गाडीतील प्रवाशांचा जीव वाचला.
या घटनेची माहिती मिळताच मनमाड येथून दुर्घटना राहत ही विशेष गाडी घटनास्थळी पाठवण्यात आली असून रेल्वे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. ज्या डब्याचे चाक तुटले तो डबा वेगळा करण्याचे काम सुरू आहे.