महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Hindu Jan Akrosh Morcha: मालेगावात आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली आज हिंदू जन आक्रोश मोर्चा, मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त - Hindu Jan Akrosh Morcha in Malegaon

हिंदुवर वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज मालेगाव येथे हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. येथील रामसेतू पुलावरून या मोर्चाला सुरुवात होणार आहे, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Hindu Jan Akrosh Morcha
हिंदू जन आक्रोश मोर्चा

By

Published : Jul 2, 2023, 11:52 AM IST

Updated : Jul 2, 2023, 12:36 PM IST

मालेगावमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा

नाशिक : मालेगावात आज भव्य हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. येथील रामसेतू पूल ते एमएसजी कॉलेजपर्यंत हा मोर्चा जाणार आहे. या ठिकाणी सभादेखील आयोजित करण्यात आली आहे. या मोर्चाला अनुसरून मुस्लिम समाजतर्फे देखील इंसानियत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या हिंदू जन आक्रोश मोर्चासाठी परवानगी देण्यात आली आहे. मुस्लिम समाजातर्फे काढण्यात येणाऱ्या इंसानियत मोर्चाला मात्र परवानगी नाकारण्यात आली असल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी सांगितले आहे.

नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली निघालेले मोर्चे :काही दिवसांपूर्वीपुण्यात हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चामध्ये हजारो हिंदू नागरिक सहभागी झाले होते. विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. धर्मांतर, गोहत्या आणि लव जिहाद यासाठी कडक कायदे करावे. त्यांची कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस धर्मवीर दिन म्हणून साजरा करावा, या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आज 'हिंदू जन आक्रोश मोर्चा'चे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात हजारो हिंदू नागरिक हे लाल महाल येथे सहभागी झाले होते.

अहमदनगर जिल्ह्यात मोर्चा :लव्ह जिहाद प्रकरणी श्रीरामपूरमध्ये गेल्या काही काळात मुली बेपत्ता होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याविरोधात आंदोलनात आता भाजपा आणि नितेश राणे हे उतरलेले दिसत होते. धर्मांतरण आणि आदिवासी तरुणांच्या अपहरणाच्या घटनाही वाढल्या होत्या. या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आदिवासी भिल्ल समाज संघटनेचे कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

  1. Hindu Jan Akrosh Morcha Pune : पुण्यात 'या' मागण्यांसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा ; हजारो नागरिकांचा सहभाग
  2. Sanjay Raut on Hindu jan akrosh morcha : छत्रपती शिवरायांचा अपमान चालतो; हिंदू आक्रोश मोर्चावर खासदार संजय राऊत यांची टीका
  3. Nitesh Rane protest in Srirampur : देवेंद्र फडणवीसांना हिंदुहृदय सम्राट म्हणण्यात चुकीचे काय ? नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली हिंदू जनआक्रोश मोर्चा
Last Updated : Jul 2, 2023, 12:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details