महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Malegaon Hijab Day : मालेगावात 'हिजाब डे', पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

मालेगावात आज एमआयएमकडून महिलांनी हिजाब व बुरखा परिधान करून हिजाब दिवस पाळण्याचं आवाहन करण्यात आलं. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

Malegaon Hijab Day
Malegaon Hijab Day

By

Published : Feb 11, 2022, 1:33 PM IST

Updated : Feb 11, 2022, 6:01 PM IST

मालेगाव (नाशिक) - हिजाब आणि बुरखा समर्थनासाठी मालेगावात आज 'हिजाब डे' पाळण्यात आला. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी मालेगावात आज कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, काल हिजाब बंदीविरोधात अनेक मुस्लिम महिला रस्त्यांवर उतरल्या होत्या. मालेगावातील अजीज अल्लू स्टेडियमवर यासंदर्भात मेळावाही आयोजित करण्यात आला होता. त्यात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या.

मालेगावात 'हिजाब डे', पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

हिजाब आमचा अधिकार आहे, त्यावरील बंदी मागे घ्या, हिजाब आमची गरज आहे मजबुरी नाही, अशा घोषवाक्यांचे फलक झळकवत हिजाब समर्थनार्थ गुरुवारी शेकडो मुस्लिम महिलांनी मालेगावातील अजीज कल्लू स्टेडियमवर आयोजित मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. एका तासाच्या मेळाव्यास आमदार मुक्ती यांनी संबोधित केले. यावेळी तुणी विविध जातींचे धार्मिक दाखले देत, पर्दा पद्धत पूर्वापार चालत आलेली परंपरा तसेच महिलांचा मान व सन्मान करणारी भारत देशाची संस्कृती आहे. ही संस्कृती नष्ट करण्याचे षड्यंत्र काही धर्मांध शक्तीकडून सुरू असल्याचे म्हणत त्यांनी हिजाबचे समर्थन करत मालेगावात हिजाब दिवस पाळण्याचे आवाहन केलं होतं. त्याला मालेगावात चांगला प्रतिसाद मिळाला.

मालेगावातील परिस्थिती...

महिलांना शपथ -

उपस्थित मेळाव्यात महिलांना हिजाब व बुरखा कायम परिधान करून आपल्या धर्माची शिकवण टिकवून ठेवण्याची शपथ देण्यात आली. तसेच आपले हक्क व अधिकारांसाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवा, असे आवाहन मेळाव्यात करण्यात आले होते.

'हिजाब डे' साजरा करणार असल्याचे मौलाना यांनी गुरुवारी सांगितले होते.

कडेकोट पोलीस बंदोबस्त -

मालेगावात आज एमआयएमच्या कडून महिलांनी हिजाब व बुरखा परिधान करून हिजाब दिवस पाळण्याचं आवाहन करण्यात आलं. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

काय आहे वाद ?

उडुपी आणि चिकमंगळुर शहरांतल्या कॉलेजांमध्ये काही विद्यार्थिनींनी वर्गात हिजाब परिधान करायला सुरुवात केली आणि जानेवारीमध्ये या वादाला सुरुवात झाली. खरं तर 28 डिसेंबर 2021 ला पहिली घटना उडुपीमध्ये घडली. त्यानंतर 3 सरकारी कॉलेजेस आणि 2 खासगी संस्था अशा एकूण पाच शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थिनींना हिजाब घालून प्रवेश करण्यास मनाई केली आहे. तर यावर कर्नाटक शिक्षण कायदा, 1983च्या कलम 133(2) चा दाखला देत सरकारने म्हटलं, की सर्वांनी एकाच प्रकारचे कपडे घालणे बंधनकारक आहे. कर्नाटक शिक्षण कायद्यानुसार शैक्षणिक संस्था आणि शालेय विकास आणि नियमन समितीला विद्यार्थ्यांचे गणवेश ठरवण्याचा अधिकार असल्याचे कर्नाटकच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी म्हटलंय. यानंतर वाद चिघगळला उडुपीमधल्या खासगी कॉलेजच्या बाहेर विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये घोषणाबाजी आणि वादावादी झाली. हिजाब घातलेला एक गट तर भगवे शेले पांघरलेला दुसरा गट एकमेकांसमोर आल्यानंतर हे कॉलेज हायकोर्टाचा याविषयीचा निकाल येईपर्यंत बंद करण्यात आलये. शिवाय कर्नाटकच्या इतरही जिल्ह्यामध्ये यावरुन दगडफेकी सारख्या घडल्या आहेत. या संपूर्ण प्रकारानंतर राज्य सरकारच्या निर्णयानुसार दोन शाळा आणि महाविद्यालय बंदच राहणार आहे. आता या घटनेचे महाराष्ट्रातही पडसाद उमटले आहेत.

महाराष्ट्रात उमटले पडसाद

कर्नाटकमध्ये सुरु झालेल्या वादाचे आता महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पडसाद उमटतांना पाहायला मिळत आहेत. सर्वात प्रथम बीडमध्ये हिजाब समर्थनार्थ बँनर लावण्यात आले होते. त्यानंतर मालेगाव आणि मुंबईतील नागपाड्यात स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. तर इतरही जिल्ह्यांमध्ये या घटनेचे पडसाद उमटताना दिसले.


हेही वाचा -Bachchu Kadu : राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

Last Updated : Feb 11, 2022, 6:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details