महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकात पावसाचा जोर कायम; नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नाशिक जिल्ह्यात मागील ४ ते ५ दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. यापार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक धरणांतून विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिक धरण
नाशिक धरण

By

Published : Aug 17, 2020, 5:42 PM IST

नाशिक - जिल्ह्यामध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून होत असलेल्या संततधार पावसामुळे बहुतांशी धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. यामुळे अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदीकाठच्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पर्यटन स्थळावर असलेली धरणे आणि धबधब्यांबर जाण्यासाठी नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे.

नाशिकमधील धरणांतून विसर्ग सुरू


नाशिककरांवरील पाणी कपात टाळली -
मागील चार - पाच दिवसांपासून नाशिकसह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे नाशिकच्या धरणातील पाणी साठा 45 टक्क्यांहून 80 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे आता ऑगस्ट महिन्याच्या अखेर पर्यंत तरी नाशिककरांवरील पाणी कपातीचे संकट टाळले आहे.

हेही वाचा -राज्यभरात मुसळधार; अनेक जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा

नाशिक जिल्ह्यातील या धरणात वाढला पाणी साठा -

  • गंगापूर धरण - 80 टक्के
  • दारणा - 90 टक्के
  • नांदूरमध्यमेश्वर - 100 टक्के
  • भोजापूर - 100 टक्के
  • नांदूरमध्यमेश्वर - 63 टक्के
  • भावली - 100 टक्के
  • पालखेड - 66 टक्के
  • हरणबारी - 100 टक्के

    या धरणांतून सुरू आहे पाण्याचा विसर्ग -
  • दारणा - 11550 क्यूसेक
  • भावली - 290 क्यूसेक
  • भोजापुर - 190 क्यूसेक
  • नांदूरमध्यमेश्वर - 110789 क्यूसेक
  • हरणबारी - 1643 क्यूसेक

ABOUT THE AUTHOR

...view details