नाशिकHemant Parakh Kidnapping:बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांना शनिवारी रात्री काही गुंडांनी वाहनातून त्यांच्या घरासमोरून चारचाकीत कोंबून सुसाट वेगाने पळून नेले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Businessman Hemant Parakh) घराजवळून हेमंत पारख यांचे अपहरण झाल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली. (Hemant Parakh release near Surat) घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासह उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत तसेच पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
पोलिसांकडून विविध पथके रवाना:अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली. त्याचबरोबर सीसीटीव्हीही तपासण्यात आले. शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. शहराबाहेर जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. या घटनेमुळे नाशिक शहरासह इंदिरानगर भागात खळबळ उडाली. पारख यांचे अपहरण पूर्व वैमन्यस्यातून झाले का, त्यांचे कुणाशी भांडण होते का? कोणी धमकी दिली होती का? हा अँगलही पोलीस तपासत करत असतांना त्यांना अपहरण केलेल्यांनी सुरत येथे सोडून पळ काढला.
- खंडणी घेऊन सुटका?पोलिसांना मध्यरात्री पारख यांचे शेवटचे लोकशन अंबेबहुला मिळाले होते. त्यानंतर पोलिसांचा शोध सुरू असताना त्यांना सोडून देण्यात आल्याचे कळाले. पारख यांच्याकडून खंडणी घेऊन ही सुटका केल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही. पारख यांना सोडून दिल्यानंतर अपहरण करणाऱ्यांनी पळ काढला.