दिंडोरी (नाशिक ) - दिंडोरी तालुक्याला गेल्या दहा ते १५ दिवसापासून विसावलेल्या पावसाने आज (शुक्रवार) दुपारी २ च्या सुमारास जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.
दिंडोरी तालुक्यातील पाश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस, पिकांना जीवदान - दिंडोरीत पाऊस
दिंडोरी तालुक्याला गेल्या दहा ते १५ दिवसापासून विसावलेल्या पावसाने आज (शुक्रवार) दुपारी २ च्या सुमारास जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.
दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी गडावर दुपारी पावसाला सुरूवात झाल्यानंतर, वणी, मुळाणे, चंडीकापूर मांदाणे, तळेगाव, औताळे, कृष्णागाव, मावडी, खेडगाव, कोशिंबे, पुणेगाव, पांडाणे, अंबानेर, अहिवंतवाडी, चामदरी, गोलदरी, माळे दुमाला, काजी माळे, पिंपरखेड, टाक्याचापाडा परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी व भाताची रोपे टाकण्यासाठी पोषक वातावरण झाले आहे. तसेच पावसाअभावी जी सोयाबीन व भुईमुग, मकेची पिके उगवण्यासाठी थांबली होती, त्यांना आज आलेल्या पावसामुळे जिवदान मिळाले आहे. आज सकाळपासून कडक ऊन असताना सप्तश्रृंगी गडावर अचानक ढग गोळा झाल्यानंतर पावसाला सुरूवात झाली. या पावसामुळे सर्वच पिकांना फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
कसबे वणीपासून दक्षिण भागात भात, नागली, वरी उडीद , मुग , भुईमुंग , सोयाबीन पिक घेतले जाते. त्यासाठी रोहीणी नक्षत्रात भात व नागलीची रोपे पाण्याअभावी करपायला सुरवात झाली होती. परंतू, अचानक आलेल्या पाऊसामुळे पिकांना जिवदान मिळाले आहे.