येवला (नाशिक) -तालुक्यातील सावखेडे, अंकाई, कुसुर, नगरसुल, ममदापूर, गवंडगाव या गावांसह तालुक्यातील उत्तर-पूर्व भागात मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावली असून या पावसामुळे शेतात पाणीच पाणी झाले असून मृग नक्षत्राचा पाऊस आल्याने बळीराजा सुखावला आहे.
येवला तालुक्यात मृग बरसला, बळीराजा सुखावला पेरणीच्या कामांना वेग
गेल्या काही दिवसापासून पाऊस पडत असल्याने मृग नक्षत्र लागताच पाऊसने तालुक्यातील उत्तर पूर्व भागात हजेरी लावल्याने पेरणीच्या कामाला देखील या पावसामुळे वेग येणार आहे.तर काही भागात शेतकऱ्यांनी मका पेरणी केल्याने पाऊसाने नक्की पिकांना फायदा होणार आहे
हेही वाचा -बालकांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणी नाशिकमध्ये गुन्हा दाखल