नाशिक - येवल्यातील अंदरसूल गावात जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे झाकून ठेवलेली मका भिजली, तर पेरलेल्या कांद्यात पाणी साठले आहे. यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे.
येवल्यातील अंदरसुल गावात जोरदार पाऊस; शेतकऱ्यांवर संकटाचं ढगाळ वातावरण
जोरदार पाऊसामुळे झाकून ठेवलेली मका भिजली, तर पेरलेल्या कांद्यात पाणी साठले आहे. यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे.
येवला तालुक्यातील अंदरसुल गावात सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसानी हजेरी लावली. सुरुवातीला काही मिनिटे पावसाच्या तुरळक सरी पडल्या. मात्र. यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू होताच नेहमीप्रमाणे वीज पुरवठा खंडित झाला. अंदरसुल गावात अचानक आलेल्या पावसामुळे झाकून ठेवलेली मका भिजली. तर नुकताच पेरणी केलेला कांद्यात पावसामुळे पाणीच - पाणी झाले. यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अगोदरच परतीच्या पावसाने मका, कापूस, कांदे इतर पिकांची नासाडी झाली आहे. तर आता अवकाळी पाऊस आणि सततच्या ढगाळ वातावरणाचा फटका द्राक्ष बाग आणि कांदा पिकाला बसणार आहे.
हेही वाचा -...मग झेड सुरक्षा कशाला, निलेश राणेंचा ठाकरेंवर निशाणा