येवला(नाशिक) - तालुक्यातील अंदरसुल, सायगाव व धामणगाव येथे सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली असल्याने हा पाऊस शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरला आहे.
येवला तालुक्यात जोरदार पाऊस; शेतकऱ्यांमध्ये समाधान
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे येवल्यातील अंदरसूल आणि सायगाव येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
येवला तालुक्यात जोरदार पाऊस
गेल्या आठवड्यातच तालुक्यातील पूर्व भागात शेतकऱ्यांनी बाजरी, मका, मूग यासह खरिपाची पेरणी पूर्ण केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. अशातच आज सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे खरिपाच्या पिकांना संजीवनी मिळाली आहे. या पावसाने अंदरसुल गावातील शेतकरी समाधानी झाला आहे. अनेक ठिकाणी शेतामध्ये या पावसाने पाणीच पाणी साचले आहे. तर तालुक्यातील पश्चिम भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहे.