नाशिक- सुरगाणा तालुक्यात गेल्या ५ ते ६ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच, झगडपाडा येथील वाकी नदीला पूर येऊन पाणी फरशी पुलावर आले होते. यामुळे, पुलाच्या दुतर्फा होत असलेली वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला - waki river
एका रुग्णाला दुचाकीवरून बाऱ्हे येथे रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र, पुलावर पाणी असल्याने दुचाकी काढणे अशक्य झाले. त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी चक्क दुचाकीलाच उचलून पाण्यातून चालून जात पुलाच्या दुसऱ्या बाजूला नेले.
पुलावरून दुचाकी नेताना ग्रामस्थ
एका रुग्णाला दुचाकीवरून बाऱ्हे येथे रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र, पुलावर पाणी असल्याने दुचाकी काढणे अशक्य झाले. त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी चक्क दुचाकीलाच उचलून पाण्यातून चालून जात पुलाच्या दुसऱ्या बाजूला नेले. दरवर्षी फरशी पुलावरून पुराचे पाणी येत असल्याने दोन्ही बाजूचा संपर्क तुटतो. त्यामुळे पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.