महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस.. पिकांचे मोठे नुकसान - नाशिक पाऊस बातमी

कोरोना विषाणूमुळे सर्वच जण आर्थिक अडचणीचा सामना करीत आहेत. त्यातच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यातील काही भागात शेवटच्या टप्यात बागेतून द्राक्ष काढण्याचे काम सुरू आहे. तसेच कांदा, मका, डाळींब, गहू, हरबरा ही पिके देखील काढणीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच या पिकांना अवकाळी पावसाने झोडपले आहे.

heavy-rain-in-nashik
नाशकात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस..

By

Published : Apr 30, 2020, 6:17 PM IST

नाशिक- नाशकातील काही भागात गुरुवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. तर काही भागात पावसासोबत गाराही पडल्या. गेल्या काही दिवसांपासून नाशिककर उकाड्याने हैराण झाले होते. मात्र, या पावसाने दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

नाशकात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस..

हेही वाचा-ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा, सर्व स्तरातून हळहळ

कोरोना विषाणूमुळे सर्वच जण आर्थिक अडचणीचा सामना करीत आहेत. त्यातच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. जिल्ह्यातील काही भागात शेवटच्या टप्यात बागेतून द्राक्ष काढण्याचे काम सुरू आहे. तसेच कांदा, मका, डाळींब, गहू, हरबरा ही पिके देखील काढणीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच या पिकांना अवकाळी पावसाने झोडपले आहे. नाशिक शहराच्या अडगाव, पंचवटी, द्वारका, नाशिकरोड जेलरोड, नांदूर नाका, मखमालाबाद, गंगापूर रोड भागात जोरदार पाऊस झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details