नाशिक- आज नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. शहरात अचानक पावसाने हजेरी लावण्याने अनेक व्यावसायिकांची तारांबळ झाली. तर असाच पाऊस सलग दोन दिवस राहणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आली. अशीच संततधार सुरू राहिल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार - नाशिकमध्ये पाऊस
आज नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली.
![नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4893322-thumbnail-3x2-nsk.jpg)
नाशकात मुसळधार
पावसाचे बोलके दृश्य
सायंकाळी काही भागात पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. इंदिरानगर, देवळालीगाव, पंचवटी, नाशिकरोड, सिडको परिसरात ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. सिडकोसह काही परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. त्यामुळे अभियंतानगरसह काही परिसरात झाडे, झाडांच्या फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या. सिडको, सातपूर, सिडको, पंचवटीसह नाशिकरोड परिसरात वीजपुरवठा खंडित झाला.
Last Updated : Oct 28, 2019, 11:28 PM IST