महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यातील धरणातून विसर्ग वाढला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा - High alert in nashik river

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस झाल्याने तेथील धरण समूहातून विसर्ग सुरू करण्यात आला. जायकवाडी धरणात बुधवारी १० हजार क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती. तर धरणाचे १६ दरवाजे, जलविद्युत प्रकल्प व दोन्ही कालव्यांतून ११५७३ क्यसेक असा विसर्ग करण्यात येत आहे. वरील धरण समूहातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आले. या धरणातील पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरणाचा विसर्ग वाढला

By

Published : Sep 26, 2019, 1:29 PM IST

नाशिक - नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील धरणांतून बुधवारी रात्री पाण्याचा विसर्ग वाढल्याने धरणातील जवळपास २५ हजार क्युसेक क्षमतेने पाणी गोदावरी व प्रवरेतून जायकवाडीच्या दिशेने झेपावले आहे. मात्र, जायकवाडी धरण शंभर टक्के भरलेले असल्याने धरणाचे १६ दरवाजे एका फुटाने उघडण्यात आले आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला देण्यात आल्याची माहिती, जायकवाडीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील धरणाचा विसर्ग वाढला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हेही वाचा -गडचिरोलीत सी-60 जवान-नक्षलवाद्यांमध्ये चकमक

तसेच जायकवाडीच्या धरणातून ८३८४ क्युसेक आणि जलविद्युत प्रकल्पातून १५८९ असा एकूण ९९७३ पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात येत आहे. यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान, गुरुवारी धरणातून आणखी विसर्ग वाढवावा लागेल, असेही काळे यांनी सांगितले.

हेही वाचा -राष्ट्रवादीची मुंबईत 'ईडी'बाहेर निर्दशने.. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या नाशिक जिल्ह्यात बुधवारी जोरदार पाऊस झाल्याने तेथील धरण समूहातून विसर्ग सुरू करण्यात आला. जायकवाडी धरणात बुधवारी १० हजार क्युसेक क्षमतेने आवक सुरू होती. तर धरणाचे १६ दरवाजे, जलविद्युत प्रकल्प व दोन्ही कालव्यांतून ११५७३ क्युसेक असा विसर्ग करण्यात येत आहे. वरील धरण समूहातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आले. या धरणातील पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे.

हेही वाचा -भारत आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये १.३ ट्रिलियन डॉलर्सची करणार गुंतवणूक - पंतप्रधान मोदी

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून ८९८५ क्युसेक, गंगापूर ११४२ क्युसेक, पालखेड २६२५ क्युसेक, कडवा ३३८४ क्युसेक असा विसर्ग करण्यात आला. हे सर्व पाणी नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यात येते. नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी पात्रात ६३१० क्युसेक विसर्ग सुरू होता. याचप्रमाणे नगर जिल्ह्यातील निळवंडे २०१६ क्युसेक, ओझर वेअर २३४७ क्युसेक, मुळा धरणातून ३००० असा विसर्ग करण्यात आला आहे. हे पाणी प्रवरेच्या पात्रातून जायकवाडीकडे झेपावले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details