महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पावसाचा कहर : मनमाडमध्ये सतर्कतेचा इशारा, रामगूळणा व पांझण नदीला पूर - manmad rain news

रामगूळणा व पांझण नदी शेजारी असलेल्या नागरी वस्तीला पुराचा फटका बसला आहे. शिवाजीनगर, हुडको, बुद्धवाडी माधवनगर या भागाशी संपर्क तुटला आहे.

नागरीवस्तीत पाणी शिरले

By

Published : Nov 2, 2019, 8:26 AM IST

Updated : Nov 2, 2019, 2:48 PM IST

नाशिक- परतीच्या पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातला असून नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील मनमाड शहरात शुक्रवारी रात्रभर मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे वागदर्डी धरण व रेल्वेला पाणी पुरवठा करणारा महादेव बंधारा पूर्णपणे भरला आहे. जोरदार पावसामुळे शहरामधून वाहणाऱ्या रामगूळणा व पांझण नदीला पूर आला आहे.

परतीच्या पावसाने मनमाडला झोडपले

हेही वाचा - दुष्काळी माण तालुक्यात आंधळी धरण भरले; माणगंगा, बानगंगा, यरळा नदीला पूर

रामगूळणा व पांझण नदी शेजारी असलेल्या नागरी वस्तीला पुराचा फटका बसला आहे. टकार मोहल्ला ईदगाह परिसरातील वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे काही टपऱ्या पाण्यात वाहून गेल्या तर अनेक घरांमध्ये पाणी शिरले. शिवाजीनगर, हुडको, बुद्धवाडी माधवनगर या भागाशी संपर्क तुटला आहे. पुराची तीव्रता पाहता स्थानिक तरुणांनी रात्री मदतकार्य हाती घेतले. अनेकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. पावसामुळे जीवितहानी झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तब्बल १२ वर्षानंतर रामगूळणा व पांझन नद्यांना पूर आला आहे. शहरामध्ये अजूनही पाऊस सुरू असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हेही वाचा - लातूर : तेरू नदीला पूर; २०० मतदार मतदानापासून वंचित

यावर्षी सरासरीपेक्षा अनेक पटीने जास्त पाऊस पडत असून पावसाने राज्यभर थैमान घातले आहे. काढणीला आलेली पिके पावसाने खराब झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

Last Updated : Nov 2, 2019, 2:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details