नाशिक (चांदवड)- परतीच्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला असून चांदवड तालुक्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढले. सलग होत असलेल्या पावसाचा फटका द्राक्ष बागेसोबत मका, बाजरी यासह इतर पिकांना बसला आहे. यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
परतीच्या पावसाचा चांदवड तालुक्यात कहर हेही वाचा -मनमाडसह नांदगांव तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ
पावसाळा संपत आला असला तरी परतीचा पाऊस रोज धुमाकूळ घालत आहे. चांदवड परिसरात सलग होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील मका, बाजरी ही उभे पिके जमीनदोस्त झाली आहेत. तसेच द्राक्षे बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला असून नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
हेही वाचा -नाशिकमध्ये 'रावणा'ने दिला स्त्री भ्रृणहत्या थांबवण्याचा संदेश
गेल्या तीन वर्षापासून दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा मेटाकुटीला आला होता. यंदा अतिवृष्टीमुळे त्याच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याचे चित्र अतिपावसामुळे निर्माण झाले आहे.