नाशिक :नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाल्यासह टोमॅटोचे मोठे नुकसान झाले ( Due to Unseasonal Rains in Nashik District ) आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात टोमॅटोची ( Vegetable Crops Including Tomatoes have Suffered ) आवक वाढल्याने टोमॅटोचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना 3 ते 4 रुपये किलोने टोमॅटो विकावा लागत ( Farmers have to Sell Tomatoes at Rs 3 to 4 Per Kg ) असल्याने, त्यात त्याचा उत्पादन खर्च निघत नाही, तर वाहतूक खर्चदेखील निघत नाही. अशात आवकाळी पावसामुळे शेतात काढणीला आलेल्या टोमॅटो पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हताश झाला आहे.
अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वातावरणावर परिणाम :अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचे परिणाम वातावरणावर होतील, असे अंदाज हवामान खात्याने वर्तविले होता. त्यामुळे डिसेंबरच्या मध्यावर महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि मध्यम पाऊस पडेल, असे सांगण्यात आले होते. हवामान खात्याचे हे अंदाज निसर्गाने तंतोतंत खरे ठरविले. नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. बुधवारी सायंकाळी अचानक जोरदार पाऊस झाला. क्षणार्धात सर्वत्र पावसाचे पाणीच पाणी झाले. रस्त्याच्या वाहतुकीला ब्रेक लागला, वाहनचालक अडोसा पाहून थांबत होते. गहू, हरभरा, कांदासोबत टोमॅटो या पिकांना तर मोठा फटका बसला आहे. अल्पकाळ आलेल्या या पावसाने सर्वांचीच धावपळ झाली होती. दरम्यान, या बेमोसमी पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले.
टोमॅटो उत्पादन शेतकरी अडचणीत :गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोची आवक वाढल्याने भाव घसरले होतेच. पण, कालच्या पावसाने टोमॅटोवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. सद्य: परिस्थितीत टोमॅटोच्या 20 किलोंच्या जाळीला पन्नास रुपये भाव होता. त्यामुळे उत्पादन खर्च निघणे अशक्य झाले आहे. त्यातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हताश झाला आहे. थंडीचा काळ गव्हासाठी पोषक असतो मात्र या पावसाने गव्हाचे नुकसान होण्याची दाट संभावना आहे. नाशिक जिल्ह्यात मोठ्या संख्येने कांद्याचे उत्पादन घेतले जाते. कांदा पीक आता कुठे हाताशी येत असताना अवकाळी पावसाने अतोनात नुकसान झाले आहे.
उघड्यावरील कांदा भिजला :येथील कांदा उत्पादकांची मोठी समस्या आहे ती, म्हणजे कांदा साठवण. साठवण क्षमता नसल्याने बहुतांशी कांदा उघड्यावरच पडून असतो. या पावसाने बहुतेक ठिकाणी कांदा भिजल्याने तो वापरायोग्य राहिला नाही.
सरकारने मदत करावी :मी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकरी असून, मी टोमॅटोची शेती करतो. गेल्या काही दिवसांपासून आमची परिस्थिती फार बिकट झाली आहे. बाजारात मोठ्या प्रमाणत टोमॅटो येत असल्याने भाव कोसळले आहेत. सध्या टोमॅटोच्या 20 किलोंच्या जाळीला 50 ते 60 रुपये भाव मिळत आहे. फक्त 2 ते 3 रुपये किलोने टोमॅटो विकला जात आहे. त्यामुळेच आमचा उत्पादन खर्च तर सोडा बाजारात आणण्याचा वाहन खर्च निघत नाही. त्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आमच्या शेतातील टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी तुकाराम जाधव केली आहे.