मनमाड (नाशिक) - भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स तसेच श्री नेमीनाथ जैन ब्राम्हचार्यश्रम, चांदवड व मनमाड बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभासद, व्यापारी शेतकरी यांच्यासह कर्मचारी यांची फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या माध्यमातून मनमाड बाजार समितीच्या सर्व घटकांची आरोग्य तपासणी होणार असल्याचे सभापती किशोर लहाने व संचालक डॉ संजय सांगळे यांनी सांगितले.
मनमाड बाजार समितीचा स्तुत्य उपक्रम.. शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची आरोग्य तपासणी - शेतकरी व व्यापाऱ्यांची आरोग्य तपासणी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभासद, व्यापारी शेतकरी यांच्यासह कर्मचारी यांचे फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या माध्यमातून मनमाड बाजार समितीच्या सर्व घटकांची आरोग्य तपासणी होणार असल्याचे सभापती किशोर लहाने व संचालक डॉ. संजय सांगळे यांनी सांगितले.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती, भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स तसेच श्री नेमिनाथ जैन ब्राम्हचार्यश्रम यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत जवळपास 565 जणांची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. काहींना किरकोळ असलेला त्रास त्यासाठी त्यांना औषध देण्यात आले, तर कोरोना संदर्भात काय काय काळजी घ्यावी यासाठी डॉक्टरातर्फे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बाजार समितीच्या सर्व कर्मचारी व्यापारी आलेल्या शेतकरी बांधवांचे आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी बाजार समितीचे सभापती किशोर लहाने,संचालक डॉ. संजय सांगळे, व्यापारी महेंद्र शिरसाठ, यांच्यासह डॉ. नितीन जैन हेही उपस्थित होते. बाजार समितीच्या आवारात ही तपासणी करण्यात आली.