नाशिक महेश मांजरेकर निर्मित हर हर महादेव हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात इतिहासाचे विडंबन केल्याचा आरोप शिवप्रेमी मधून होत आहे. हर हर महादेव चित्रपटात शूरवीरांच्या कर्तुत्वावर खोडसाळपणा केल्याचा आरोप होत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवप्रेमीनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
Har Har Mahadev Movie: हर हर महादेव चित्रपटाचे खेळ सुरु करा, नाही तर मनसे स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा - राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवप्रेमीनी आक्रमक भूमिका
Har Har Mahadev Movie: महेश मांजरेकर निर्मित हर हर महादेव हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात इतिहासाचे विडंबन केल्याचा आरोप शिवप्रेमी मधून होत आहे. हर हर महादेव चित्रपटात शूरवीरांच्या कर्तुत्वावर खोडसाळपणा केल्याचा आरोप होत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवप्रेमीनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
चित्रपटाला समर्थन दिले राज्यात ठिकठिकाणी हर हर महादेव चित्रपटाचे खेळ बंद पाडले जात असून चित्रपटगृह चालकांनीही जनरेटा बघून चित्रपट प्रदर्शित न करण्याची भुमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने मात्र हर हर महादेव चित्रपटाला समर्थन दिले आहे. नाशिकच्या चित्रपट गृहात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी हर हर महादेव चित्रपटाचे खेळ बंद केल्यानंतर मनसैनिक सुध्दा आक्रमक झाले आहे.
तणावाचे वातावरण निर्माण चित्रपट गृहात जाऊन हर हर महादेव चित्रपट पुन्हा सुरू करावा, अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन करू असा इशारा चित्रपट गृह चालकाला दिला आहे. तेव्हा परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक झाल्याने इथे तणाव निर्माण झाला होता.