महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंजनेरी येथील श्री हनुमान जन्मोत्सव रद्द; कोरोनामुळे साध्या पद्धतीने पूजाविधी संपन्न - Anjneri hanuman yatra

अंजनेरी येथील हनुमान जयंती यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. अंजनेरी श्री हनुमानाचे जन्मस्थान असल्याने दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात याठिकाणी यात्रा भरत असते. मात्र यावर्षी राज्यासह नाशिक जिल्ह्यात देखील कोरोनाचा कहर कायम आहे. त्यामुळे यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला असल्याने गडावर शुकशुकाट बघायला मिळाला.

अंजनेरी हनुमान टेकडी

By

Published : Apr 27, 2021, 4:24 PM IST

नाशिक - हनुमानाचे जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंजनेरी पर्वतावर यंदा सलग दुसऱ्या वर्षी हनुमान जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली आहे. कोरोनाचे सावट यावर्षीही कायम असल्याने मंदिर बंद ठेवण्यात आले होते. तर भाविकांची गर्दी होऊ नये, म्हणून पोलिसांचा फौजफाटादेखील मंदिराबाहेर तैनात करण्यात आला होता.

मंदिराबाहेर पोलीस बंदोबस्त

रामभक्त हनुमानाचे जन्मस्थान म्हणून त्र्यंबकेश्वरजवळ असलेल्या अंजनेरी पर्वताला ओळखले जाते. यामुळे दरवर्षी याठिकाणी हनुमान जयंती निमिताने राज्यातील भाविक दर्शनासाठी दाखल होत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून ही यात्रा रद्द करण्यात करण्यात येत आहे. कोरोनामुळे आज सलग दुसऱ्या वर्षीही हनुमान जन्मोत्सव रद्द करत पहाटे मंदिराच्या पुजाऱ्यांनीच विधिवत पूजा केली आणि मंदिर बंद करण्यात आले. तर मंदिर परिसरात भाविक दाखल होऊ नये, म्हणून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.

यात्रोत्सव रद्द

अंजनेरी येथील हनुमान जयंती यात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. अंजनेरी श्री हनुमानाचे जन्मस्थान असल्याने दरवर्षी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात याठिकाणी यात्रा भरत असते. मात्र यावर्षी राज्यासह नाशिक जिल्ह्यात देखील कोरोनाचा कहर कायम आहे. त्यामुळे यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला असल्याने गडावर शुकशुकाट बघायला मिळाला. तर हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी होणारी बेझे येथील शिलाई माता तसेच वाढोली येथील श्री भैरवनाथ यात्रादेखील रद्द करण्यात आली. त्यामुळे भाविकांनी गर्दी न करण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details