महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik Handicapped Married : ...अन् त्यांनी सरपटत सात फेरे घेतले; नाशिकमधील अनोखी प्रेमकहाणी - नाशिकमध्ये दिव्यांगांचा विवाह पार पडला

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात आगळा वेगळा प्रेमी विवाह सोहळा उत्साहात पार पडला. आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन घेत, त्यांना सरपटत, सरपटत सात फेरे घेतले. अन् आयुष्याची नवी सुरु केली ( Nashik Handicapped Married ) आहे.

Nashik Handicapped Married
Nashik Handicapped Married

By

Published : Jul 23, 2022, 4:21 PM IST

सिन्नर ( नाशिक ) -नाशिकच्या सिन्नर तालुक्यात आगळा वेगळा प्रेमी विवाह सोहळा उत्साहात पार पडला. आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन घेत, त्यांना सरपटत, सरपटत सात फेरे घेतले. अन् आयुष्याची नवी सुरु केली आहे. यावेळी उपस्थित असलेल्या सर्वांना नवदांम्पत्यास आशीर्वाद दिले ( Nashik Handicapped Married ) आहेत.

सात फेरे घेताना प्रेमीयुगल

प्रेमविवाह होणे आता नवीन गोष्ट राहिली नाही. प्रेमाच्यागाठी या स्वर्गात बांधल्या जातात, असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील उजनी गावात आला. येथील दोन दिव्यांग प्रेमींनी आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन देत विवाहबद्ध झाले आहेत. या वधू-वराचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

सिन्नर तालूक्यातील उजनी येथील जालिंदर आणि सारिका जन्मताच अपंग. मात्र, दोघांनाही शिक्षणाची ओढ होती. काहीही झाले तरी आपण शिक्षण पूर्ण करायचे ही जिद्द त्यांनी ठेवली. मग सुरू झाला शिक्षणासाठीचा प्रवास. दोघांच्या घरची परिस्थिती हलाखीची. त्यामुळे दररोज शाळेत कोण सोडणार? त्यात वाहन व्यवस्था तर दूरच. पण, आपण म्हणतो ना जिथे इच्छा असेल तिथे मार्ग निघतो. तसेच इथेही घडलं अन् दोघांना दररोज चप्पल हातात घालून सरपटत का होईन शाळेत जाण्याचा निश्चय केला.

या निश्चयामुळे दोन्हींचे शिक्षण पूर्ण झाले. याच काळात दोघांची मैत्री झाली. आपल्या दोघांची व्यथा एकच असल्याने ते एकमेकांची काळजी घेऊ लागले. मग त्यांच्यात प्रेम अंकुर निर्माण झाले अन् दोघांनीही विवाहबद्ध होण्याची इच्छा कुटुंबाकडे बोलून दाखवली. घरच्यांनी त्यांच्या प्रेमाचे कौतुक करत, त्यांना होकार दिला. मग अतिशय साधेपणाने हा विवाह सोहळा सिन्नर तालुक्यातील उजनी गावात संपन्न झाला. या अनोख्या प्रेमकहाणीची चर्चा जिल्ह्यात सर्वत्र होत आहे.

हेही वाचा -Dhol Tasa Tradition: 'तरुणाईच्या उत्साहामुळे ढोल- ताशा उद्योगाला भरभराट, कधी कशी सुरू झाली?, ढोल ताशा पथकांची परंपरा

ABOUT THE AUTHOR

...view details