नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मजुरी करणाऱ्या महिलेवर सहकारी हमालाने शौचालय परिसरात अत्याचार करण्याचा प्रयत्न (Attempt to molest woman labourer) केला. महिलेने नकार दिल्याने तिला मारहाण करत तिच्या कानाला चावा घेतल्याने कानाचा तुकडा पडल्याचा (beating woman and biting her ear) धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर संशयित हमाल पिंटू गौतम फरार झाला असून त्याच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Nashik Crime, latest news from Nashik
महिलेचा विनयभंग -पोलिसांना पीडित महिलेने दिलेल्या तक्रार नुसार पंचवटी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महिला मजुरीचे काम करते. मध्यरात्री बाजार समितीमध्ये व्यापारांकडे भाजीपाला भरण्याचे काम आटपून शौचालयात जात असताना बाजारात हमाली करणारा ओळखीचा संशयित पिंटू गौतम याने तिचा अडवले. माझ्यासोबत चल असे त्याने म्हटले असता महिलेने त्याला नकार दिला. संशयिताला याचा राग आल्याने त्याने महिलेला अंगावर ओढून घेत विनयभंग केला. यानंतर शौचालयाच्या बाजूच्या जागेत खाली पडले.