नाशिक -नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे ( Guardian Minister Dada Bhuse ) विरुद्ध खासदार हेमंत गोडसे ( MP Hemant Godse ) यांच्यात स्तुप्त संघर्ष सुरू असताना, दादा भुसे यांच्या पुत्र्याच्या होर्डिंग चांगलीच ( Abishkar Bhuse, son of Dada Bhuse ) चर्चा शहरात रंगली आहे. दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ( Abishkar Bhuse birthday ) भावी खासदाराचा उल्लेख असलेले होर्डिंग लागल्याची बाब शहरभर चर्चेचा विषय ठरली आहे. यापूर्वी धुळे लोकसभा मतदारसंघात आविष्कार हे खासदारकीची निवडणूक लढवतील अशी चर्चा होती मात्र, पालकमंत्री पद मिळाल्यानंतर खासदारकीचा नवा आविष्कार नाशिक लोकसभा मतदारसंघात होणार की काय असा प्रश्न चर्चेत आला आहे.
Dada Bhuse : दादा भुसे यांच्या पुत्राचे होल्डिंग चर्चेत, शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर - Bhuse son banner discussed in Nashik
पालकमंत्री दादा भुसे ( Guardian Minister Dada Bhuse ) यांच्या पुत्राचे होल्डिंग चर्चेत आहे. दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे ( Abishkar Bhuse, son of Dada Bhuse ) यांच्या वाढदिवसानिमित्ताने ( Abishkar Bhuse birthday ) भावी खासदाराचा उल्लेख असलेले होर्डिंग लागल्याची बाब शहरभर चर्चेचा विषय ठरली आहे.
ठाण्यातून रसद पुरवली?एकीकडे नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, शिंदे गटाचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेला असताना दुसरीकडे पालकमंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर अविष्कार भुसे यांचा उल्लेख थेट भावी खासदार करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकमधल्या शिंदे गटात आणखीच वाद उफाळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे पालकमंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव हे उद्धव ठाकरे यांच्या गटातील ठाण्याचे खासदार राजन विचारे ( MP Rajan vichare ) यांचे जावई देखील असल्याने ठाण्यातूनच या होर्डिंगला रसद पुरवली की काय असा सवाल उपस्थित झाला होता.
भावी खासदाराचे होर्डिंग काढण्याचे आदेश -स्थानिक पातळीवर शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहून पालकमंत्री दादा भुसे यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. आविष्कार भुसे यांच्या 'भावी खासदार' या होर्डिंगमुळे शिंदे गटातील संभाव्य राजकीय वाद टाळण्यासाठी शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले होर्डिंग काढून घेण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहे.