नाशिक -जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 1 लाख 25 हजार बालके बाधित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, यातील 95 टक्के बालके घरीच होम क्वांरटाइन होऊन बरे होतील, तर 5 टक्के बालकांना संस्थात्मक क्वारंटाइन करावे लागेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यासाठी बाराशेहून अधिक बेडची तयारी करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली, कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीनतंर ते पत्रकारांशी बोलत होते.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू कमी होत आहे, मात्र तरी देखील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. अशात आता प्रशासनाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नाशिक जिल्ह्यात सुमार 1 लाख 25 हजार बालकं कोरोनाबाधित होऊ शकतात. पण त्यातील जेमतेम पाच टक्के बालकांना वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागू शकते असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.