नाशिक- देवळा तालुक्यातील मेशी गावानजीक रिक्षा आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बससह रिक्षा विहीरीत कोसळली आहे. या घटनेत जवळपास २० प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच जवळपास ३५ ते ४० प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने नाशिकचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच तहसीलदार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. या अपघातग्रस्तांना तातडीची सर्वोतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहे.
नाशिकमधील अपघातग्रस्तांना तातडीने आवश्यक ती मदत द्या - पालकमंत्री छगन भुजबळ - nashik accident
देवळा तालुक्यातील मेशी गावानजीक रिक्षा आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बससह रिक्षा विहिरीत कोसळली आहे. या घटनेत जवळपास २० प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच जवळपास ३५ ते ४० प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने नाशिकचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच तहसीलदार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला.
पालकमंत्री छगन भुजबळ यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी,जिल्हा शल्यचिकित्सक आणि तहसीलदार यांच्याशी संपर्क करून घटनेची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी या दुर्घटनेत मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना परिवहन विभागाशी चर्चा करून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचा सूचना केल्या. त्याचप्रमाणे जखमी झालेल्या प्रवाशाना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांनाही आवश्यक ती शासकीय मदत द्यावी, असे आदेश त्यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. तसेच आपण स्वतः परिवहन विभागाशी चर्चा करून मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना आणि जखमींना मदत मिळवून दिली जाईल, असे आश्वासित केले. तसेच दुर्घटनेत मृत झालेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.