नाशिक -येवला तालुक्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. वादळामुळे अनेक गावांमध्ये नुकसान झाले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अंदरसुल गावात झालेल्या नुकसानीची आज पाहणी केली.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली येवल्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
निसर्ग चक्रीवादळ व जोरदार पावसाच्या तडाख्यामुळे येवल्यात अनेक घरांची पडझड झाली आहे. शेतकरी बांधवांच्या घरांचे आणि कांदाचाळींचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा भुजबळ यांनी आढावा घेतला.
अंदरसुल गावातील शेतकरी गजानन देशमुख यांच्या पोल्ट्री फार्मचे शेड वादळात पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. पोल्ट्री फॉर्ममध्ये असलेल्या कोंबड्या पावसाने भिजल्या असून काही कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या वादळात देशमुख यांचे 22 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याच नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अंदरसुल गावाला भेट दिली.
निसर्ग वादळ व जोरदार पावसाच्या तडाख्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. शेतकरी बांधवांच्या घरांचे आणि कांदाचाळींचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा भुजबळ यांनी आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यानंतर निसर्ग वादळ, कोरोना उपाय योजना आणि खरीप हंगामाच्या पूर्वतयारीबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.