महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येवला; मुक्तिभूमी येथे चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त अभिवादन - चवदार तळे सत्याग्रह मुक्तिभुमी न्यूज

20 मार्च 1927 रोजी महाड येथील सार्वजनिक असलेले चवदार तळे अस्पृश्यांना पाणी भरण्यासाठी व पिण्यासाठी मनाई केली जात होते.म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च रोजी बहिष्कृत परिषद गाजवून महाडचे चवदार तळे या ठिकाणी स्वतः बाबासाहेबांनी ओंजळभर पाणी घेऊन प्राशन केले होते .

मुक्तिभुमी येथे चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त अभिवादन
मुक्तिभुमी येथे चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त अभिवादन

By

Published : Mar 21, 2021, 5:19 PM IST

Updated : Mar 21, 2021, 6:16 PM IST

नाशिक - येवला शहरातील मुक्तीभूमी येथे चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्यावतीने अभिवादन करण्यात आले .प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळ्यासमोर सामूहिक बुद्ध वंदना व पंचशील त्रिशरण भीम स्तुती घेण्यात आली. यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन चे तालुका संघटक बाळासाहेब चंदन यांच्या हस्ते दीप्रज्वलन करण्यात आले.

मुक्तिभूमी येथे चवदार तळे सत्याग्रह दिनानिमित्त अभिवादन
चवदार तळे सत्याग्रह दिन....20 मार्च 1927 रोजी महाड येथील सार्वजनिक असलेले चवदार तळे अस्पृश्यांना पाणी भरण्यासाठी व पिण्यासाठी मनाई केली जात होते.म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च रोजी बहिष्कृत परिषद गाजवून महाडचे चवदार तळे या ठिकाणी स्वतः बाबासाहेबांनी ओंजळभर पाणी घेऊन प्राशन केले होते . पाणी हे जीवन आहे आणि त्या पाण्यावर माणसाचा माणसाचा नैसर्गिक हक्क व अधिकार आहे .म्हणून बाबासाहेबांनी पिण्याचे पाणी सर्वांसाठी खुले करून देण्यासाठी तळ्यातले पाणी स्पर्श करून पिले होते.

हेही वाचा-रमबीर सिंहांच्या लेटर बाॅम्बने सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडाले - संजय राऊत

मुक्तीभूमी येथे अभिवादन....
महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रह दिनानिमित्त येवला मुक्तीभूमी येथे क्रांती स्तंभास ही अभिवादन करून चवदार तळे सत्याग्रह दिन मोठ्या उत्सवात साजरा करत अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुका सचिव शशिकांत जगताप ,बाळासाहेब चंदन, राम कोळगे, तुळशीराम जगताप ,संतोष गायकवाड, जगताप बालू भाई उपस्थित होते.

हेही वाचा-मनसुख हिरेन हत्येप्रकरणी दोघांना अटक; एका बडतर्फ पोलिसाचा समावेश

Last Updated : Mar 21, 2021, 6:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details