नाशिक - जिल्ह्यात 1 आणि 2 डिसेंबरला झालेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल 10 हजार 599 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, यात सर्वाधिक 6 हजार 500 हेक्टरवरील द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक नुकसान बागलाण तालुक्यातीलशेतकऱ्यांचे झाले आहे.
माहिती देताना रयत क्रांती संघटनेचे विभागीय अध्यक्ष दीपक पगार हेही वाचा -Nashik Studio Robbery : नाशकात मंदार गर्गे आर्ट स्टुडिओवर सिनेस्टाईल दरोडा, लाखोंचे साहित्य केले लंपास
नाशिक जिल्हा हा द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे. येथील द्राक्षाला देशासोबत विदेशात देखील मोठी मागणी असते. मात्र, यावर्षी 1 आणि 2 डिसेंबरला झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 6 हजार 500 हेक्टरवरील द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले. एकट्या बागलाण तालुक्यात अर्ली द्राक्षांचे एकूण 1 हजार 850 हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी 922 हेक्टर द्राक्षांचे पूर्ण, तर काही बागांचे निम्मे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकांवर पाणी साचले होते. त्यामुळे, आता मण्यांना तडे गेले असून त्यात अळ्या पडण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे, निर्यातक्षम द्राक्ष फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजाने नुकसान कमी
हवामान खात्याने आठ दिवस आधीपासूनच वातावरणात होणारा बदल आणि पावसाचा अंदाज दिला होता. त्यामुळे, अनेक शेतकऱ्यांनी द्राक्षबागांभोवती कापडी आवरण करून नुकसानाची तीव्रता कमी केली होती. यामुळे द्राक्ष थंडीपासून बचावले. पण, पावसामुळे भिजलेल्या घडांचे नुकसान मात्र शेतकरी वाचवू शकला नाही.
नाहीतर कृषिमंत्र्यांसमोर द्राक्ष ओतू
द्राक्ष उत्पादक दहा वर्षांपासून क्रॉप कव्हरसाठी अनुदानाची मागणी करीत आहेत. मात्र, त्यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय सरकारकडून घेण्यात आला नाही. सदाभाऊ खोत यांनी कव्हरसाठी प्रक्रिया केली होती, मात्र महाआघाडी सरकारने बस्तानात ठेवली आहे. आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून त्यांना कर्जमुक्त करावे, अन्यथा रयत क्रांती संघटनेच्यावतीने कृषिमंत्र्यांच्या दारासमोर द्राक्ष ओतून आंदोलन करू, असा इशारा शेतकरी नेते दीपक पगारे यांनी दिला.
तालुका निहाय बाधित क्षेत्र
सटाणा - 2837 हेक्टर
नांदगाव - 2550 हेक्टर
कळवण - 827 हेक्टर
देवळा - 70 हेक्टर
दिंडोरी - 2265 हेक्टर
सुरगाणा - 31 हेक्टर
नाशिक - 1424 हेक्टर
त्र्यंबकेश्वर - 228 हेक्टर
इगतपुरी - 253 हेक्टर
पेठ - 18 हेक्टर
चांदवड - 2469 हेक्टर
येवला - 53 हेक्टर
सिन्नर - 512 हेक्टर
निफाड - 1328 हेक्टर
मालेगाव - 921 हेक्टर
हेही वाचा -Nashik Brothel : नाशिकच्या भद्रकाली भागातील दीडशे वर्षपूर्वीचा कुंटणखाना पोलिसांकडून सील