नाशिक - लहरी वातावरणाचा फटका दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादन आणि उन्हाळा कांद्याला बसत असल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. रात्री थंडी, सकाळी ढगाळ वातावरण आणि दुपारी कडक उन्हाळा अशा परिस्थितीमुळे द्राक्षातील शर्कराप्रमाणावर परिणाम होतो आहे.
खराब वातावरणाचा फटका नाशिकमधील द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका हेही वाचा -मनमाड-नांदगाव रस्त्यावर अपघात; एक ठार, तीन गंभीर जखमी
थंडी आणि उन्हाचा चटका लागल्यामुळे निर्यातक्षम द्राक्षाचा रंग गरजेपेक्षा जास्त गडद होत आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्षांची गळ सुरू झाली आहे. या वातावरणाचा फटका कांदा पिकालाहा बसत आहे. मावा आणि चिक्का पडल्यामुळे कांदा पिक खराब होण्याच्या मार्गावर आहे. या परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष आणि कांदा उत्पादन घेतले जाते. येथील मालाची देशासह परदेशातही निर्यात केली जाते. वातावरणाचा पिकांना फटका बसत असल्याने याचा परिणाम या वर्षीच्या निर्यातीवर होणार आहे.