नाशिक - दिंडोरी तालुक्यातील हजारो हेक्टर (15046.19) द्राक्ष बागा धोक्यात आल्या आहेत. पांडाणे येथील रमेश मेधणे यांच्या दीड एकर द्राक्षबागाचे नुकसान झाले आहे. वर्षभर बागेचा कुठलाही फायदा मिळणार नसून आता द्राक्षबागांची वर्षभर औषधाची फवारणी करुन सांभाळाव्या लागणार आहेत. उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना आता पुढील वर्षाची वाट पहावी लागणार असल्याचे द्राक्ष बागायतदार सचिन मेधणे यांनी सांगितले.
दिंडोरीतील द्राक्षबागांचे नुकसान; शेतकऱ्यांची शासनाकडे मदतीची मागणी हेही वाचा - नांदेड : ११ महिन्यात शंभराहून अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
शेतकरी मेधणे म्हणाले, बागेची 19 सप्टेंबर ला गोळाबार छाटणी केली होती. त्यानंतर 10 ते 12 दिवसात द्राक्ष पीक पोंगा अवस्थेत येते. परंतू, पोंगा अवस्थेत आलेली द्राक्षबाग दोन महिने पाण्याच्या संकटात सापडल्यामुळे द्राक्ष पिकावर डावणी रोगाचा प्रार्दुभाव झाला होता. डावणी रोगातून आम्ही द्राक्ष बाग वाचवली. मात्र,'प्लारींग'मध्ये पाऊस असल्यामुळे बागेला फळकूजेचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे द्राक्षबागांचे संपूर्ण नुकसान झाले आहे.
मागील दोन महिण्यांच्या कालावधीत द्राक्षबागांवर एक ते सव्वा लाख रुपये औषधांचा खर्च झाला असून अजून द्राक्षबाग वर्षभर सांभाळाव्या लागणार आहेत. यासाठी आणखी एक लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार असल्याने शासनाने एका वर्षातील बागेचा संपूर्ण खर्च देण्याची मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी सचिन मेधणे यांनी केली आहे.
हेही वाचा - शिवसेनेसोबत जाणे म्हणजे स्वतःला दफन करून घेणे; निरुपम यांचा काँग्रेसला घरचा आहेर