महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिंडोरीत मध्यम स्वरुपाचा पाऊस; द्राक्ष उत्पादक धास्तावले - दिंडोरी द्राक्ष उत्पादक न्यूज

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्यातील वातावरणावर याचा परिणाम दिसू लागला आहे. मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

Grapes
द्राक्ष

By

Published : Dec 14, 2020, 9:59 AM IST

नाशिक -दिंडोरी तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत पडला आहे. वातावरणातील वाढलेला गारवा आणि त्यातच रिमझिम पाऊस पडत असल्याने द्राक्षाच्या घडांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत

गेल्या गुरुवारपासून द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिंडोरीमध्ये ढगाळ वातावरण आहे. पिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. गहू, हरभरा, द्राक्ष, कांदा या पिकांवर रोगराई वाढण्यास सुरुवात झाली आहे. याचा द्राक्ष बागांवरही विपरीत परिणाम होत आहे. द्राक्ष उत्पादकांनी या वातावरणामुळे चांगलीच धास्ती घेतली आहे.

शेतकरी चिंतेत -

ढगाळ वातावरण राहिल्यास द्राक्ष फळांवर भुरी पडणे, पाने गळणे, वाढ खुंटणे असे रोग पडू शकतात. द्राक्ष बाग वाचवण्यासाठी आता कोणती औषध फवारणी करावी, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. औषध फवारणीमुळे द्राक्ष उत्पादकांचे आर्थिक बजेट कोलमडेल. तसेच, कांदा पिकांवरही करपा रोग पडण्याची शक्यता असल्याचे जाणकार शेतकरी सांगतात. आधीच कोरोना आणि आता नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

रायगडमध्येही आंबा पिकावर परिणाम होण्याची भीती -

रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात पावसाने हजेरी लावली आहे. पोलादपूरपासून अलिबागपर्यंत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. काही ठिकाणी सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणात बदल झाला आहे. अवकाळी पावसामुळे आंबा पिकावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details