महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नातवाने केली आजीची हत्या, नाशिक जिल्ह्यातील घटना - etv bharat marathi

आजी सतत बाेलते म्हणूण एका नातवाने आजीच्या डाेक्यात कुऱ्हाड घालून तिला ठार केल्याची धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वायघाेळ पाडा येथे घडली आहे. या प्रकरणी नातवाला हरसूल पाेलिसांनी अटक केली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेतील आरोपीला घेऊन जाताना पोलीस
घटनेतील आरोपीला घेऊन जाताना पोलीस

By

Published : Oct 18, 2021, 7:36 AM IST

नाशिक - आजी सतत बाेलते म्हणूण एका नातवाने आजीच्या डाेक्यात कुऱ्हाड घालून तिला ठार केल्याची धक्कादायक घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वायघाेळ पाडा येथे घडली आहे. या प्रकरणी नातवाला हरसूल पाेलिसांनी अटक केली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

तू वेडा आहेस, काम करत नाहीस

भामाबाई शवरे (वय ६५) असे मृत आजीचे नाव असून कृष्णा शेवरे (वय २९) असे नातवाचे नाव आहे. तू वेडा आहेस, काम करत नाहीस, रिकमा हिंडताे, असे आज्जीचे शब्द कानी पडत असल्याने त्याने तिची हत्या केल्याचे पाेलिसांनी सांगितले आहे. या नातवाने शनिवारी भामाबाई यांच्या तोंडावर, गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घातले. त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी कृष्णाचे वडील लक्ष्मण शेवरे यांच्या तक्रारीवरून कृष्णा शेवरेवर हरसूल पोलीस ठाण्यात ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. संशयित अरोपीला न्यायालयान २ दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे. आजी सतत बोलते या किरकोळ कारणातुन नातवाने आजीची हत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा -सर्वांना गर्व होईल असे काम करून दाखवणार.. समुपदेशनात आर्यन खानचा एनसीबीला शब्द

ABOUT THE AUTHOR

...view details