महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 19, 2021, 10:23 PM IST

ETV Bharat / state

दिंडोरी : ग्रामपंचायत अपहार प्रकरणी ग्रामसेवकासह, सरपंच आणि उपसरपंचावर गुन्हा दाखल

तालुक्यातील आशेवाडी ग्रामपंचायतीत 15 एप्रिल ते 22 एप्रिल 2021 दरम्यान विविध विकासकामांसाठी आलेला शासकीय निधी वापरला नाही. ग्रामसेवक दिलीप वामनराव मोहिते (रा.साकोरे मिग), सरपंच जिजाबाई कचरू तांदळे व उपसरपंच सुनीता संजय बोडके या तिघांनी हा निधी त्यांचे ओळखीच्या चार व्यक्तींच्या नावे धनादेश, आरटीजीएस व रोख रुपये 37,30,089 रुपये अदा केली.

dindori police station
दिंडोरी पोलीस ठाणे

दिंडोरी (नाशिक)-तालुक्यातील बहुचर्चित आशेवाडी ग्रामपंचायतीच्या विकासकांमाच्या सुमारे 37 लाखांचे शासकीय निधीच्या अपहार प्रकरणी ग्रामसेवकासह विद्यमान सरपंच, उपसरपंच यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विस्तार अधिकारी यांच्या तक्रारीनुसार दिंडोरी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

37 लाखांचा अपहार -

तालुक्यातील आशेवाडी ग्रामपंचायतीत 15 एप्रिल ते 22 एप्रिल 2021 दरम्यान विविध विकासकामांसाठी आलेला शासकीय निधी वापरला नाही. ग्रामसेवक दिलीप वामनराव मोहिते (रा.साकोरे मिग), सरपंच जिजाबाई कचरू तांदळे व उपसरपंच सुनीता संजय बोडके या तिघांनी हा निधी त्यांचे ओळखीच्या चार व्यक्तींच्या नावे धनादेश, आरटीजीएस व रोख रुपये 37,30,089 रुपये अदा केली. यानंतर ती रक्कम पुन्हा त्या व्यक्तींच्या खात्यातून काढून घेतली आणि तिघांनी संगनमत करत वाटून घेतली. याप्रकरणी अपहार केल्याची तक्रार पंचायत समिती दिंडोरीचे विस्ताराधिकारी आण्णा किसन गोपाळ यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरुन दिंडोरी पोलिसांनी तिघांविरोधात विविध कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा -खराब व्हेंटिलेटर देणाऱ्या कंपन्यांवर सरकारने गुन्हे दाखल करावेत - जलील

ABOUT THE AUTHOR

...view details