महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनवाली शादी! एकुलत्या एक लेकीचे लग्न साध्या पद्धतीने लावत गरजूंना 25 हजारांचे साहित्य वाटप - लग्न खर्चातून गरजूंना साहित्य वाटप दिंडोरी

दिंडोरी येथे पार पडलेला एक विवाह सोहळा इतरांनी आदर्श घ्यावा असा होता. आपल्या एकुलत्या एक मुलीचे लग्न पित्याने 'ना सनई चौघडा, ना बँडबाजा आणि ना वऱ्हाडी' अशा साध्या पद्धतीने उरकले आणि त्या लग्नाचा सगळा खर्च वाचवून त्या रकमेतून गरीबांना मदत केली आहे.

wedding during lockdown dindori nashik
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दिंडोरीत साध्या पद्धतीने पार पडला विवाह सोहळा

By

Published : May 14, 2020, 3:02 PM IST

दिंडोरी (नाशिक) : कोरोना विषाणूमुळे सर्व जग ठप्प झाले आहे. सर्व सामान्यांचे दैनंदिन व्यवहार त्यामुळे बंद पडले आहेत. कित्येक कार्यक्रम आणि महत्वाची कामे लोकांना रद्द करावी लागली आहेत. मात्र, केंद्र सरकारने विवाह सोहळ्यासाठी नियम आणि अटी लागू करत परवानगी दिली आहे. त्यामुळे साध्या पद्धतीने का होईना, रखडलेली लग्नकार्ये होताना दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथेही असाच एक विवाह सोहळा पार पडला.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दिंडोरीत साध्या पद्धतीने पार पडला विवाह सोहळा.. बचत केलेल्या रकमेतून गरजूंना साहित्य वाटप...

दिंडोरी येथे पार पडलेला हा विवाह सोहळा मात्र इतरांनी आदर्श घ्यावा असा होता. आपल्या एकुलत्या एक मुलीचे लग्न पित्याने 'ना सनई चौघडा, ना बँडबाजा आणि ना वऱ्हाडी' अशा साध्या पद्धतीने उरकले आणि त्या लग्नाचा सगळा खर्च वाचवून त्या रकमेतून गरीबांना मदत केली आहे.

हेही वाचा...लॉकडाऊनवाली शादी! वधु नंदुरबारची नवरदेव धुळ्याचा अन् लग्न झाले रत्नागिरीत.. पाहा या अनोख्या लग्नाची गोष्ट

दिंडोरी येथील बागूल परिवारातील वधू मयुरी आणि रहाणे परिवारातील नवरदेव अजिंक्य हे दोघेही लॉकडाऊनच्या काळात विवाह बंधनात अडकले आहेत. हो दोन्ही कुटुंब तसे सधन आणि संपन्न आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात समोर असलेली भीषण परिस्थिती त्यांनी नजरेआड होऊ दिली नाही. सर्व प्रथम त्यांनी शासनाच्या सर्व अटी आणि शर्तींचे पालन करत विवाह सोहळा पार पाडला.

नवरा मुलगा आणि नवरी मुलीने तोंडाला मास्क बांधून लग्न आटोपले. महत्वाचे म्हणजे नातेवाईकांसह भटजींनी देखील सोशल डिस्टन्सिंग पाळत मंगलअष्टका म्हटल्या आहेत. वधु पित्याने या संपुर्ण लग्नातील अनावश्यक खर्चाला फाटा देत, त्यातून वाचलेल्या पैशातून गरजूंना तब्बल पंचवीस हजारांचे शिधा साहित्य वाटप केले आहे.

यावेळी बोलताना, वधु आणि नवरदेवाने 'लॉकडाऊन संपल्यानंतर देखील सर्वांनी अशाच पद्धतीने लग्न सोहळे पार पाडावेत' अशी सुचना केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details