नाशिक - राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे विधिवत पूजा करून शंकराचे दर्शन घेतले. कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नाशिक दौरा होता. ओझर विमानतळावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतानंतर ते त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी आले होते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये यावेळी पुरोहितांसमवेत त्यांनी पूजा करून आशीर्वाद घेतले.
राज्यपाल भगत सिंग कोश्यारींनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन - मुख्याधिकारी प्रवीण निकम
राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे विधिवत पूजा करून शंकराचे दर्शन घेतले. कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नाशिक दौरा होता.
राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी आज त्र्यंबकेश्वर येथे विविधवत पूजा करून शंकराचे दर्शन घेतले
यावेळी उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण, येवला उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील, नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगांवकर, उपनगराध्यक्ष कैलास चोथे, देवस्थानचे विश्वस्त संतोष कदम तसेच तहसीलदार दिपक गिरासे उपस्थित होते.
त्र्यंबकेश्वर येथे आगमन झाल्यानंतर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रवीण निकम यांनी राज्यपालांचे स्वागत केले.
Last Updated : Sep 20, 2019, 4:12 AM IST