नाशिक - कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने परदेशातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निविदा देखील मागवण्यात आल्या आहेत. मात्र, यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
परदेशातून कांद्याची आयात, शेतकरी-व्यापारी नाराज
कांद्याच्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारमार्फत परदेशातून 2 हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -कांद्याचे दर कडाडले; लासलगाव बाजारात मिळाला सर्वाधिक भाव
कांद्याच्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारमार्फत परदेशातून 2 हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी इजिप्त, पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तान या देशात निविदा काढण्यात आल्या आहेत. सध्या कांद्याला 2700 ते 2800 क्विंटल पर्यंत चांगला भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे सरकारने इतर देशातून कांदा आयात करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.